Wednesday, January 22, 2025

/

“बीम्स”च्या कोव्हीड -19 आरटी-पीसीआर लॅबचे झाले उद्घाटन

 belgaum

बीम्स हॉस्पिटलमधील नूतन कोव्हीड -19 आरटी-पीसीआर लॅबचे उद्घाटन करून बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके यांनी आज मंगळवारी राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री डॉ. सुधाकर के. यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग केली.

शहरातील बीम्स हॉस्पिटलमध्ये नव्याने स्थापण्यात आलेल्या कोव्हीड -19 आरटी-पीसीआर लॅबचा अर्थात प्रयोगशाळेचा उद्घाटन समारंभ आज मंगळवारी सकाळी आयोजित करण्यात आला होता. प्रमुख पाहुणे बेळगांव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके यांनी फीत कापून या नूतन प्रयोगशाळेचे उद्घाटन केले. उद्घाटन समारंभाचे औचित्य साधून आमदार अनिल बेनके यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री सुधाकर के यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कोरोनाला रोखण्यासंदर्भातील आपल्या कल्पना मंत्र्यांसमोर मांडल्या तसेच कोरोनासंदर्भातील जिल्हा प्रशासनातर्फे केली जाणारी तपासणी, काॅरंटाईन आणि उपचाराबाबतच्या प्रोटोकॉल संदर्भात मंत्र्यांशी चर्चा केली.

Benke
Benke

यावर मंत्री सुधाकर के. यांनी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार कोरोना प्रादुर्भावाला यशस्वीरित्या हाताळत आहे. याचे बेळगांव जिल्हा उत्तम उदाहरण आहे. बेळगांव हा कर्नाटकातील सर्वात मोठा जिल्हा असून देखील या ठिकाणी ॲक्टिव्ह केसेस फक्त 25 आहेत, असे सांगून बेळगावच्या फ्रंटलाईन वॉरियर्सच्या अथक प्रयत्नांबद्दल मंत्रांनी प्रशंसोद्गार काढले.

याप्रसंगी बीम्सचे वैद्यकीय संचालक डॉ. विनय दास्तीकोप, मुख्य कार्यकारी अधिकारी बळ्ळारी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. काझी, डाॅ. गिरीश आदींसह संपूर्ण मेडिकल स्टाफ उपस्थित होता.

 belgaum

1 COMMENT

  1. Please update the Covid 19 case details immediately after Karnataka state health bulletin in this news.
    Also inform the positive case person with his or her area.
    This will help us to take care.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.