Friday, December 27, 2024

/

मूर्तिकार मंडप डेकोरेशन साऊंड सिस्टम वाल्याना आर्थिक मदत हवी’

 belgaum

कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा श्री गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय जर शहरातील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी घेतला तर या उत्सवावर अवलंबून असणाऱ्या उद्योजक व कामगारांवर आर्थिक संकटात येणार असल्यामुळे त्यांच्यासाठी विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळ बेळगावतर्फे जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांच्याकडे करण्यात आली आहे.

मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळ बेळगावतर्फे रमाकांत कोंडुसकर, किरण जाधव आदींच्या नेतृत्वाखाली उपरोक्त मागणीचे निवेदन सोमवारी सकाळी जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांना सादर करण्यात आले. निवेदनाचा स्वीकार करून पालकमंत्री जारकीहोळी यांनी यासंदर्भात जिल्हाधिकार्‍यांना सांगून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे यंदाचा श्री गणेशोत्सव कशा पद्धतीने साजरा करावा यासंदर्भात शहर व उपनगरातील सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळांमध्ये वेगवेगळी मते आहेत. कोरोनामुळे शहर व उपनगरातील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानी यंदाचा गणेशोत्सव जर अत्यंत साधेपणाने साजरा केला तर या गणेशोत्सवावर अवलंबून असणाऱ्या उद्योजकांनी कामगारांचे आर्थिक नुकसान होणार आहे. यासाठी दरवर्षी गणेशोत्सवावर अवलंबून असणाऱ्या मूर्तिकार, मंडप डेकोरेटर्स, साऊंड सिस्टिमवाले आदी सर्वांसह संबंधित लघु व्यवसायिकांना आधार देण्यासाठी विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करावे. त्याचप्रमाणे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना ज्या अन्य समस्यांना सामोरे जावे लागते त्या संदर्भात चर्चा करण्यासाठी खास बैठक बोलविण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

Gnesh mandal
Gnesh mandal

गणेशोत्सव महामंडळातर्फे निवेदन सादर करतेवेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी, आमदार ॲड. अनिल बेनके, रमाकांत कोंडुसकर, किरण जाधव, मालोजी अष्टेकर, मदन बामणे, विकास कलघटगी आदींसह महामंडळाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

दरम्यान, यंदाचा श्री गणेशोत्सव दरवर्षीप्रमाणे साजरा करण्यास परवानगी द्यावी. कोरोनामुळे मूर्तिकार, साऊंड सिस्टिमवाले, मंडप डेकोरेटर्स आदी सर्वजण आर्थिक संकटात सापडले आहेत. यात भर म्हणून यंदाचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा केल्यास संबंधित लोकांची परिस्थिती अधिकच बिकट होणार आहे. यासाठी गणेशोत्सवावर अवलंबून असणाऱ्या संबंधित लोकांना सरकार कडून अनुदान मिळावे, अशी मागणी आपण जिल्हा पालक मंत्री रमेश जारकीहोळी यांच्याकडे केली असल्याचे श्रीराम सेना हिंदुस्तानचे राष्ट्रीय अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांनी “बेळगाव लाईव्ह”शी बोलताना सांगितले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.