बेळगाव तालुक्यात परराज्यातून येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना यासाठी जिल्हा प्रशासनही सज्ज झाले आहे. बेळगाव तालुक्यात अजूनही 1400 हून अधिक जणांना क्वॉरंटाइनमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यामुळे ही संख्या अजून वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
शाळा अंगणवाडी ग्रामपंचायत यासह इतर स्थानिक संस्थांमध्ये या सार्यांना ठेवण्यात आले आहे. 1435 क्वॉरंटाइनमध्ये आहेत तर यामध्ये 900 हून अधिक पुरुषांचा समावेश आहे. क्वॉरंटाइनमध्ये असणाऱ्या व्यक्तींची योग्य सोय करण्यासाठी ग्रामपंचायत व आरोग्य खाते झटत आहेत. यांची स्वब तपासणी अजून झाली नसली तरी लवकरच त्याची तपासणी करून अहवाल आल्यानंतर त्यांची सोय करण्यात येणार आहे.
बेळगाव तालुक्यातील परराज्यातून येणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने दिवसेंदिवस भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना सारख्या महाभयंकर रोगामुळे अनेक जण हैराण झाले असताना आता ही संख्या घटवण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे.
बेळगाव तालुक्यातील वाढती लोकसंख्या आणि वाढत्या रुग्णाना मुळे चिंतेचे वातावरण आहे. मागील दोन दिवसांपासून बेळगावला दिलासा मिळाला असला तरी क्वॉरंटाइनमध्ये ठेवण्यात आलेल्यांची संख्या अधिक आहे. ग्रामपंचायत आरोग्य खाते व अंगणवाडी आणि आशा कर्मचारी यासाठी अहोरात्र झटत आहेत. बेळगाव तालुक्यातील रुग्ण संख्या कमी करण्यासाठी प्रयत्न होत आहेत.