काश्मिरी युवकांनी दिलेल्या राष्ट्र विरोधी घोषणाबाजी प्रकरणी चार्जशीट वेळेत दाखल न केल्या प्रकरणी एक पोलीस निरीक्षकाला निलंबित करण्याचा आदेश बेळगाव उत्तर विभागाचे आय जी पी राघवेंद्र सुहास यांनी बजावला आहे.
जॅकसन डिसोझा असे या पोलिस निरीक्षकांचे नाव असून त्यांच्यावर 90 दिवसांच्या आत राष्ट्रविरोधी घोषणा दिलेल्या काश्मिरी तरुणावर चार्जशीट दाखल न केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
गेल्या फेब्रुवारी महिन्यात हुबळी येथे काश्मिरी युवकांनी राष्ट्रविरोधी घोषणा दिल्याचा व्हीडिओ व्हायरल झाला होता त्या नंतर त्या युवकांना अटक करुन बेळगावातील हिंडलगा जेल मध्ये देखील ठेवण्यात आले होते.90 दिवसात आरोप पत्र दाखल न केल्याने त्यांना जामीन मिळाला होता त्यामुळे जॅकसन डिसोझा या हुबळी येथील पोलीस निरीक्षकांना निलंबित करण्यात आले आहे.
पोलीस निरीक्षक डिसोझा यांनी यापूर्वी बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात उपनिरीक्षक म्हणून सेवा बजावली होती.