केंद्रीय गृहमंत्रालयाने कोणत्याही राज्यात जाण्यास किंवा येण्यास असलेले निर्बंध उठवले असून मालवाहतुकीची वाहने आणि प्रवासी वाहने यांना कोणताही परवाना किंवा ई पास घेण्याची आवश्यकता नाही.
पण राज्य सरकारला अन्य राज्यातून येणाऱ्या व्यक्तींना,वाहनांना बंदी घालण्याचा अधिकार दिला आहे.याचाच वापर करून कर्नाटक सरकारने महाराष्ट्रातून रस्त्यामार्गे कर्नाटकात येण्यास बंदी घातली असून कर्नाटक महाराष्ट्र सीमेवरील कोगनोळी चेकपोस्ट सील करण्यात आला आहे.
15 जूनपर्यंत महाराष्ट्रातून येणाऱ्या व्यक्तींना नो एंट्री आदेश जाहीर केला आहे.पण महाराष्ट्रातून कर्नाटकात येणाऱ्या व्यक्ती विमानाने येऊ शकतात.त्यांना सात दिवस इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन आणि नंतर सात दिवस होम क्वारंटाईन करण्यात येणार आहे.
विमानातून येणाऱ्या व्यक्तीकडे दोन दिवस अगोदर घेतलेले कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र असेल तर मात्र त्यांना चौदा दिवस फक्त होम क्वारंटाईन करण्यात येणार आहे.या क्वारंटाईनसाठी एक मदतनीस ठेवून घेण्याची मुभा आहे.दहा वर्षाखालील मुले,साठ वर्षावरील व्यक्ती,कुटुंबातील कोणाचा मृत्यू झाला असेल तर आणि कामानिमित्त येऊन परत जाणार असतील तर त्यांना क्वारंटाईन करण्यात येणार नाही.