कर्नाटकात जुलै महिन्यात करोना रुग्णाच्या संख्येत लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे.
तज्ज्ञांनी हा कोरोना वाढीचा निष्कर्ष काढला असून त्याला सामोरे जाण्यासाठी कर्नाटक सरकार तयार असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री के सुधाकर यांनी चिक्कबळापूर येथे पत्रकारांशी बोलताना दिली.
अन्य देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत कमालीची वाढ काही महिन्यात झाली पण आपल्या देशात पाच महिने झाले तरी रुग्णांच्या संख्येत कमालीची वाढ झालेली नाही किंवा लाट आलेली नाही.
राज्यात करोना रुग्णांच्या तपासणीसाठी 70 प्रयोगशाळा सुरू करण्यात आल्या आहेत.आजवर चार लाख रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे असे मंत्री के सुधाकर यांनी सांगितले.