नूतन जिल्हाधिकारी एम जी हिरेमठ यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारला.सेवा निवृत्त झालेले मावळते जिल्हाधिकारी डॉ एस बी बोमनहळळी यांनी हिरेमठ यांना पदभार सोपवला.
बेळगाव हा राज्यातील सर्वात मोठा आणि संवेदनशील जिल्हा आहे मी बेळगाव जिल्ह्याचा आहे त्यामुळे मला काम करायला सोपं होईल असे मत नूतन जिल्हाधिकारी एम जी हिरेमठ यांनी केलं.
गदग जिल्ह्यात पूर स्थिती कोरोना हाताळला आहे सगळ्या गोष्टींचा अनुभव आहे त्याचा फायदा बेळगावात काम करताना होईल असेही ते म्हणाले.
बेळगावचा डी सी म्हणून कार्य केलेल्या काळात सहकार्य केलेल्यांचे आभार व्यक्त केले.
असा आहे नूतन जिल्हाधिकारी यांचा परिचय
महंतेश जी हिरेमठ बैलहोंगल तालुक्यातील गनिकोप्प गावचे रहिवाशी
कर्नाटक विश्वविद्यालयाच्या वतीनं एम एस सी(भौतिकशास्त्र) पदवी घेतली हुबळीत भौतिक शास्त्र म्हणून प्राध्यापक,
1991 मध्ये के पी एस सी ,2015 कर्नाटक सरकार कडून प्रमोटेड आय ए एस,
बागलकोट जिल्हा पंचायत सी ई ओ म्हणून कार्य- हुबळी धारवाड बी आर टी एस कंपनी एम डी म्हणून कार्य, आगष्ट 2018 पासून गदगचे डी सी म्हणून काम