केंद्रीय गृहमंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करण्याचा निर्णय घेऊन कर्नाटक सरकारने कंटेनमेंट झोनमधील लॉक डाऊन येत्या 30 जूनपर्यंत वाढविला आहे. त्याचप्रमाणे राज्यातील मंदिरे, प्रार्थनास्थळे, हॉटेल, रेस्टॉरंट आदींसह शॉपिंग मॉल येत्या 8 जूनपासून जनतेसाठी खुले असणार आहेत.
कर्नाटकात येणाऱ्या प्रवाशांसाठी सोमवार दि. 1 जून 2020 पासून पुढील नियम लागू असतील. प्रवाशांनी सेवा सिंधू ॲपवर स्वयम् नोंदणी केली पाहिजे. ही नोंदणी करताना नांव, पत्ता, मोबाईल नंबर देणे आवश्यक आहे. एकाच वेळी अनेक ठिकाणी नोंदणी करताना एकच मोबाईल क्रमांक चालणार नाही, मात्र कुटुंबासाठी ही अट वगळण्यात आली आहे. उद्योजक किंवा प्रवास करणाऱ्यांनी राज्यात ते कोणाला भेटण्यासाठी चालले आहेत, त्याचा तपशील दिला पाहिजे. प्रत्येक व्यक्तीचे हेल्थ स्क्रीनिंग केले जाईल. सीमेवरील चेकपोस्ट, विमानतळ, रेल्वे स्थानक आणि बस स्थानकावर हे स्क्रीनिंग होईल. हातावर 14 दिवसांचा होम काॅरन्टाईनचा शिक्का मारला जाईल. रोगलक्षणात्मक प्रवाशांचे 7 दिवसाचे इन्स्टिट्यूश्नल काॅरन्टाईन व 7 दिवसाचे होम काॅरन्टाईन करावे लागेल. प्रवाशांच्या चाचण्या पॉझिटिव्ह आल्यास त्यांना त्वरित कोव्हीड हॉस्पिटलमध्ये दाखल केले जाईल. चाचणी निगेटिव्ह असेल तर पुढील प्रक्रीयेची गरज नाही.
महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला कर्नाटकात आल्यानंतर 7 दिवसाचे इन्स्टिट्यूश्नल काॅरन्टाईन व 7 दिवसाचे होम काॅरन्टाईन करावेच लागले. दहा दिवसाच्या होम काॅरन्टाईनसाठी एका व्यक्ती सोबत एकाला सोबत करता येईल. कुटुंबात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नातलग, गर्भवती महिला, 10 वर्षाखालील मुले आणि 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक या खास श्रेणीतील लोकांसाठी 14 दिवसाचे होम काॅरन्टाईन नसेल. कुटुंबात जर अधिक व्यक्ती असतील किंवा झोपडपट्टीतील किंवा गर्दी असणारी वसाहत अशा ठिकाणच्या व्यक्तींना होम काॅरन्टाईन शक्य नसेल. यासाठी त्यांचे इन्स्टिट्यूश्नल काॅरन्टाईन केले जाईल. स्वतःचे वाहन घेऊन एखादी व्यक्ती रस्ते मार्गाने राज्यात येत असेल तर त्या व्यक्तीला आपला संपूर्ण पत्ता पुराव्यासह सादर करावा लागेल.
ग्रामीण भागात संबंधितांनी होम काॅरन्टाईनचे पोस्टर घरावर लावले पाहिजे. दोघा शेजार्यांना आपल्या होम काॅरन्टाईनची माहिती दिली पाहिजे. ग्रामपंचायत टास्क फोर्सवर होम काॅरन्टाईन व्यक्तींची संपूर्ण जबाबदारी असेल. प्रत्येक गावात तीन सदस्यांचे पाहणी पथक नियुक्त केले जावे.
माझे ऑफिस बेळगाव मध्ये आहे आणि मी महाराष्ट्र(कोल्हापूर) चा रहिवासी आहे मला महाराष्टातुन दररोज (daily up & down) कर्नाटकात प्रवास करता येऊ शकेल काय?