उत्पादन शुल्क विभागाने केंद्राच्या आणि कर्नाटकच्या सुधारित कर्फ्यूच्या वेळेच्या अनुषंगाने सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत मद्य विक्रीस परवानगी दिली आहे.
यापूर्वी सायंकाळी 7 वाजेपर्यंत राज्यातील दारूची दुकाने बंद ठेवावी लागली. राज्य सरकारने 4 मेपासून दारू विक्री पुन्हा सुरू करण्यास परवानगी दिली.
लॉक डाऊन काळात दीड महिने दारूची दुकाने पूर्णपणे बंद राहिल्याने मद्यपींची गैरसोय झाली होती. मात्र ही दुकाने बंद केल्यामुळे सरकारचा महसुलही बुडत असल्याचे लक्षात आले होते. यामुळेच ती उघडावी लागली असून सुरवातीचे काही दिवस या दुकानांसमोर गर्दीचा महापुरच पाहायला मिळाला आहे.
बेळगाव जिल्ह्यातही दारूची विक्रमी विक्री होत असल्याचे दिसून आले आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात आली असली तरी दारू दुकाने सायंकाळी 7 वाजता बंद होण्याने सायंकाळी गर्दी जास्त होत असल्याचे दिसून येत होते. आता सर्वच व्यवहार रात्री उशिरा पर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय झाल्यानंतर दारूची दुकानेही रात्री 9 पर्यंत सुरू ठेवता येणार आहेत.