कोरोनासंदर्भात कर्नाटक राज्य सरकारने राज्यातील खासगी हॉस्पिटलच्या नांवाची यादी जाहीर केली असून यामध्ये बेळगाव जिल्ह्यातील 47 हॉस्पिटल्सचा समावेश आहे. आता या हॉस्पिटल्समध्ये देखील सरकारच्या मार्गदर्शक सूचीअनुसार कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत.
एबीएआरके योजनेअंतर्गत सुवर्ण आरोग्य सुरक्षा ट्रस्टशी (एसएएसटी) संलग्न असलेल्या राज्यातील संबंधित खाजगी हॉस्पिटल्समध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांवरील उपचार सुरु करण्याचा आदेश राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव जावैद अख्तर (आरोग्य) यांनी दिला आहे.
राज्यातील 518 खाजगी मेडिकल कॉलेज /हॉस्पिटल्स हे एबीएआरकेशी संलग्न आहेत. या हॉस्पिटल्सच्या नांवाची यादी एसएएसटीच्या वेबसाईट http://www.arogya.karnataka.gov.in आणि आरोग्य खात्याच्या वेबसाईट http://karunadu.karanataka.gov.in/hfw/home.aspex वर उपलब्ध आहे.
त्याचप्रमाणे 1800 – 4252646 या टोल फ्री क्रमांकावर ती उपलब्ध असणार आहे. कोरोना बाधित रुग्णांवरील उपचारासाठी संबंधित हॉस्पिटल्सना सरकारने निश्चित केलेल्या दराप्रमाणे खर्च दिला जाणार असल्याचे अतिरिक्त सचिव अख्तर यांनी स्पष्ट केले आहे.