belgaum

मान्सून पूर्व पावसाचा दणका लेंडी नाला फुटला

0
484
Lendi nala
Lendi nala file photo
 belgaum

लेंडी नाल्याची साफसफाई करण्यासाठी शेतकरी संघटनेने नेहमीच पाठपुरावा केला आहे. त्यामुळे बऱ्याच प्रमाणात नाल्याची खोदाई करण्यात आली. मात्र रविवारी सोमवारी झालेल्या मान्सुनपूर्व दमदार पावसामुळे एका ठिकाणी नाला फुटला आहे. त्यामुळे शिवारात पाणी शिरले आहे. तेंव्हा नाल्याची पूर्ण खोदाई होणे गरजेचे आहे.

महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी त्याची पाहणी केली आहे. आता तरी महापालिकेने या नाल्याचे पूर्ण काम करावे, अन्यथा यावर्षीही शहराला महापूरचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त हात आहे. किल्ला खंदकापासून राष्ट्रीय महामार्गाकडे जाणाऱ्या नाल्यावर अतिक्रमण करण्यातआले आहे.

Lendi nala
Lendi nala file photo

एकाने त्या ठिकाणी तब्बल १० ट्रक हून अधिक काही साहित्य नाल्यामध्येच ठेवले आहे. ते स्कॅप हटवावे, असे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नारायण सावंत यांनी सांगितले. प्रत्यक्ष जाऊन पाहणी करुन त्यांनी संबंधितांना सुचना केली आहे. तरी या प्रकाराकडे महापालिकेने लक्ष देवून ते अतिक्रमण हटवावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

 belgaum

किल्ला खंदकापासून मोठ्या प्रमाणात दरंग नाल्यातून पाणी जाते. ते पाणी राष्ट्रीय महामार्गाच्या पूर्वेकडील बाजुला जाते. कुडची परिसरातील शेतकरी या नाल्याचे पाणी शेतीसाठी वापरतात. त्यानंतर ते पाणी बळळारी नाल्याला जाते. त्यामुळे समर्थ नगर कॉलनीला त्याचा पूर येतो. पाण्याचा निचरा योग्य झाला तरच पूर येत नाही. तेव्हा ते अतिक्रमण तातडीने हटवावे अशी मागणी करण्यात आली. याकडे महापालिकेने लक्ष देण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.