राज्याच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केलेल्या कोरोना वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार आज रविवार दि. 21 जून 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत राज्यात नव्याने 453 कोरोनाग्रस्त रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 9,150 इतकी झाली आहे. बेळगाव जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 303 इतकी स्थिर असून 1,667 जणांचा तपासणी अहवाल हाती येणे बाकी आहे.
राज्याच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केलेल्या कोरोना वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार शनिवार दि. 20 जून सायंकाळी 5 वाजल्यापासून आज रविवार दि. 21 जून 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत राज्यात आढळून आलेल्या 453 कोरोनाबाधितांमध्ये 5 आंतरराष्ट्रीय, तर 69 आंतरराज्य प्रवाशांचा समावेश आहे. राज्यातील 9,150 कोरोनाग्रस्तांपैकी 5,618 जणांना आत्तापर्यंत हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात ॲक्टिव्ह केसेस 3,391 असून यापैकी 77 जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. गेल्या 24 तासात कोरोनामुळे आणखी पाच जणांचा मृत्यू झाल्यामुळे राज्यातील मृतांची संख्या 137 इतकी झाली आहे. यापैकी चौघांच्या मृत्यूचे कारण नॉन – कोव्हीड आहे. राज्यात काल सायंकाळपासून सर्वाधिक 196 कोरोना बाधित रुग्ण बेंगलोर शहरात आढळून आले आहेत. त्यामुळे बेंगलोर शहर सर्वाधिक 1,272 रुग्णांसह राज्यात आघाडीवर आहे.
*जिल्ह्यात 1667 अहवाल प्रलंबित*
बेळगाव जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याच्या सर्व्हिलन्स युनिटने प्रसिद्धीस दिलेल्या कोरोना वैद्यकीय पत्रकानुसार रविवार दि. 21 जून 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत बेळगाव जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 303 इतकी स्थिर होती. आत्तापर्यंत एकूण 19,247 जणांचे निरीक्षण पूर्ण झाले असून 15,539 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्याचप्रमाणे अद्याप 1,667 नमुन्यांचे अहवाल हाती येणे बाकी आहेत. जिल्ह्यात ॲक्टिव्ह केसेस 26 आहेत.
जिल्ह्यातील 14 दिवसांसाठी होम काॅरन्टाईन केलेल्या जिल्ह्यातील व्यक्तींची संख्या 4,384 झाली असून हॉस्पिटलमध्ये आयसोलेशन करण्यात आलेल्या व्यक्तींची संख्या 26 आहे. काॅरन्टाईन अर्थात विलगीकरणाचा 14 दिवसांचा कालावधी पूर्ण केलेल्या लोकांची संख्या 5,252 आहे, तर काॅरन्टाईनचा 28 दिवसांचा कालावधी पूर्ण केलेल्या व्यक्तींची संख्या 9,585 आहे. कोरोना विषाणू संसर्ग निदानासाठी एकूण 17,951 जणांचे स्वॅब नमुने घेण्यात आले होते. त्यापैकी आत्तापर्यंत 303 (1) नमुन्यांचा वैद्यकीय रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. जिल्ह्याबाहेरील (बागलकोट) पॉझिटिव्ह रुग्ण 08 आहेत. जिल्ह्यात आजपर्यंत एकाच रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांपैकी 284 रुग्ण कोरोना संसर्गापासून मुक्त अर्थात पूर्णपणे बरे झाले असून त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.