बेळगाव तालुक्यातील कडोली गावांमध्ये मोठ्या प्रमाणात लोंबकळणाऱ्या तारा दिसत होत्या. याचा फटका शेतकऱ्यांना व नागरिकांना बसला. अनेकांचा यामध्ये मृत्यूही झाल्याच्या घटना घडल्या आहेत. पावसाळ्यापूर्वी या लोंबकळणाऱ्या तारांची दुरुस्ती करावी अशी मागणी जोर धरू लागली होती. त्याची दखल घेत लोंबकळणाऱ्या तारा आता उंच करून पुन्हा खांबावर बांधल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांबरोबरच नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
कडोली भागात मोठ्या प्रमाणात लिंबकळणाऱ्या तारा असल्याने शेतकऱ्यांना मोठी अडचण होत होती. शेती काम करताना लोंबकळणाऱ्या ताराचा स्पर्श होत होता. त्यामुळे अनेकांतून भीती व्यक्त करण्यात येत होती.
या लोमकाळणाऱ्या तारा तातडीने वर करून बांधाव्यात अशी मागणी शेतकरी वर्गातून करण्यात आली. त्यामुळे कडोली ग्रामपंचायत मधील अध्यक्ष मनीषा पाटील यांनी हेस्कॉमला याची माहिती दिली व तातडीने हे काम पूर्ण करण्याचे सांगितले. याची दखल घेत हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांनी लोंबकळणाऱ्या तारांना खांबावर उडून बांधले आहे.
त्यामुळे समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
लोंबकळणाऱ्या तारांमुळे काही वर्षांपूर्वी कडोली भागात दोघा जणांचा मृत्यू झाला होता. याचा विचार करत आता ग्रामपंचायतीने दिलेल्या तक्रारीनुसार आपली जबाबदारी पार पाडली आहे. या हेस्कॉमच्या कार्य तत्परतेमुळे नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. यापुढेही जिथे कोठे तारा लोंम्बकळत असेल तर त्यांनी हेस्कॉमशी संपर्क साधून तातडीने त्या दुरुस्त करण्याचे आश्वासनही यावेळी देण्यात आले आहे.