बेळगाव पोलीस आयुक्तांची बदली-के त्यागराजन नवे पोलीस आयुक्त-बेळगाव पोलीस आयुक्त लोकेश कुमार यांची बदली झाली आहे झाली असून त्यांच्या जागी डॉ के त्यागराजन यांची बेळगाव पोलीस आयुक्त पदी नियुक्ती झाली आहे.
लोकेश कुमार यांची बंगळुरू या ठिकाणी डी आय जी म्हणून बदली झाली असून आर्थिक गुन्हेगारी पथक सी आय डी डी आय जी डॉ के त्यागराजन यांची बेळगाव पोलीस आयुक्त पदी नियुक्ती झाली आहे.
शुक्रवारी रात्री राज्य सरकारने हा बदलीचा आदेश बजावला आहे. नवे पोलीस आयुक्त त्यागराजन हे 2006 बॅचचे आय पी एस अधिकारी असून बंगळुरू मध्ये कार्यरत होते.
लोकेश कुमार हे गेल्या वर्षी 21 फेब्रुवारी 2019 रोजी बेळगाव पोलीस आयुक्त म्हणून रुजू झाले होते जवळपास एक वर्ष पाच महिने त्यांनी आयुक्त म्हणून सेवा केली आहे. शांत स्वभावाचे आयुक्त म्हणून परिचित होते.