सिविल हॉस्पिटल मधील कारभार कोरोना सारख्या महाभयंकर रोगाशी झुंजत असताना त्यांना पौष्टिक आहार देणे हे सिविल प्रशासनाचे कर्तव्य आहे. मात्र एक प्रकारे रुग्णांच्या आरोग्याची खेळण्याचा प्रकार प्रशासनाने सुरू केला आहे. याआधी जेवनात झुरळ सापडला होता तर त्यानंतर मुंग्या असलेली अंडी देण्यात येत असल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.
याबाबत सिविल प्रशासन मात्र कोणती दक्षता घेत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे याकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे याबाबत एक विशेष पथक नेमून जेवणाचे खबरदारी घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असले तरी कोरोना बाधित रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार कधी थांबणार असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
सोमवारी रात्री देण्यात येणार्या अंड्यामध्येमुंग्या सापडल्याचे दिसून आले. भाताच्या कंटेनरमध्ये घालून वाटप करण्यात आलेल्या अंड्यांना मुंग्या लागल्या होत्या. हा प्रकार तातडीने बाधितांनी बिंस प्रशासनाला निदर्शनास आणून दिला. मात्र कोरोना बाधितांकडे सहानुभूतीने पाहण्याची एवजी त्यांनाच उलट आडकाठीत धरण्याचा प्रकार घडला. त्यामुळे संताप व्यक्त होत आहे. याबाबत सिव्हिल प्रशासन लक्ष देणार का असा सवाल आता अंतर्मुख करणारा ठरत आहे. झुरळ मुंग्या अशा कीटक असलेल्या आहारात जेवण करणार तरी कसे हा प्रश्न पडत आहे
. याबाबत आता गांभीर्याने विचार करून सिविल प्रशासनाने आणि बीम्स प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घ्यावी असेच मत व्यक्त होत आहे.