Friday, December 20, 2024

/

अपघातग्रस्त गंभीर जखमी गाईची “त्यांनी” केली गो शाळेत रवानगी

 belgaum

नागरी वसाहतीतील महामार्गाच्या दुतर्फा संरक्षक कुंपण अर्थात बॅरिकेड्स नसल्यामुळे भरधाव वाहनाच्या ठोकरीने एक गर्भवती गाय गंभीर जखमी झाल्याची घटना आज रविवारी सकाळी श्रीनगर गार्डनची राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 वर घडली.

शहरातील श्रीनगर गार्डननजीक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वर आज शुक्रवारी सकाळी 8.30च्या सुमारास अज्ञात वाहनाच्या ठाकरेने एक गर्भवती गाय गंभीर जखमी झाली. नवीन नामक युवकाने सदर माहिती “हा माझा धर्म” संघटनेच्या विनायक केसरकर यांना देताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

Injured cow
Injured cow

दरम्यान, श्रीराम सेना हिंदुस्तानचे कार्यकर्ते देखील घटनास्थळी दाखल झाले. या सर्वांनी गायीवर प्राथमिक उपचार करून तिची रवानगी महावीर गोशाळेत केली आहे.

राष्ट्रीय महामार्गाच्या दुतर्फा बॅरिकेड्स नसल्यामुळे हा अपघात घडला असल्याने मोकाट जनावरे आणि प्राण्यांचे बळी रोखण्यासाठी नागरी वसाहती आणि वसाहतीनजीकच्या महामार्गावर दुतर्फा बॅरिकेड्स करण्याची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.