एक महिन्याच्या आत बेळगावच्या सुवर्ण सौधमध्ये बेंगलोरची कार्यालये स्थलांतरित करा असा आदेश मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा यांनी बजावला आहे.
यापूर्वीही अनेक बैठकीत पांढरा हत्ती बनलेल्या सुवर्ण सौधमध्ये सरकारी कार्यालये हलवण्या संबंधी चर्चा होऊन निर्णय झाले पण कार्यवाही झाली नाही.आता मुख्यमंत्र्यांनी च आदेश दिल्यामुळे त्याची एक महिन्यात अमलबजावणी होते की नाही हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
यापूर्वीही अनेक संघटनांनी ,राजकीय पक्षांनी सुवर्ण सौधमध्ये बंगलोर येथील सरकारी कार्यालये हलवण्याची मागणी करून आंदोलने देखील छेडण्यात आली होती पण अद्याप सगळे तसेच राहिले आहे.आता दस्तुरखुद्द मुख्यमंत्र्यांनी आदेश बाजावल्यामुळे सुवर्ण सौधमध्ये बंगलोरमधील काही कार्यालये स्थलांतरित होतील अशी अपेक्षा आहे.
एक महिन्याच्या आत कार्यालयांचे स्थलांतर करा ,मी स्वतः पाहणी करणार आहे असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.
सार्वजनिक बांधकाम खाते,बंदर,जलवाहतूक खात्याच्या बैठकीत हा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे.