वर्षभरापासून बेळगाव येथे 220 केवीचे स्टेशन उभारण्याचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र जागेअभावी हे काम धूळ खात पडलेल्याचे दिसून येत आहे. देसुर नंदीहळी भागांमध्ये हे स्टेशन उभे करण्यात येणार होते. मात्र तेथे जागा नसल्याने मागील वर्षभरापासून 220 केव्ही स्टेशनचे काम धूळखात पडले असून याकडे गांभीर्याने लक्ष देण्यात येत नसल्याचे सांगण्यात येत आहे.
जर 220 केव्ही चे स्टेशन झाले तर देसूर नंदीहली परिसरात अनेक गावांना वीजपुरवठा सुरळीत होणार आहे. याचबरोबर सध्या जागेचा शोध सुरू आहे. परंतु योग्य जागा मिळाली नसल्याने या स्टेशनचे काम रखडले आहे.
बेळगाव शहर व तालुक्यातला हिंडाल्को येथील 220 केवी स्टेशन मधून वीज पुरवठा करण्यात येतो. तेथून सर्व ग्रामीण भागात हा वीज पुरवठा करण्यात येत असला तरी या केंद्राची बिघाड झाल्यास वारंवार वीज पुरवठा खंडित होत असतो. त्यामुळे आता नव्याने होत असलेल्या 220 केवी स्टेशनचे काम रखडल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे.
याकडे गांभीर्याने लक्ष देऊन आणि परिसरात जागा नेमून ते स्टेशन उभे करावे अशी मागणी होत आहे. देसूर नंदिहली परिसरात येरमाळ येथे असलेल्या खाजगी जागेत पाहणी करण्यात आली. मात्र कागदपत्रांना अभावी हे काम रखडले आहे. आता तातडीने या कामासाठी शोध घ्यावा अशी मागणी होत आहे.