जगण्याची धडपड आणि पोटाची खळगी भरण्यासाठी माणूस काहीही करू शकतो. मात्र अन्न वस्त्र आणि निवारा या तीन गोष्टी जर माणसाला मिळाल्या नाहीत तर मात्र त्यांचे जगणे कठीण होते. अशाच अडचणीत सापडलेल्या तीन महिलांनी चक्क स्वच्छतागृहात आपला संसार थाटला आहे. त्यामुळे सामाजिक हिचजपणार्या संस्थांनी त्यांच्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी होत आहे.
मध्यवर्ती बसस्थानकात सध्या लॉक डाऊन मुळे शुकशुकाट पसरला आहे. तेथे कोणीही सध्यातरी दिसत नाहीत. तेथे असलेल्या स्वच्छतागृहात तीन महिलांनी आपला संसार थाटला आहे. गडिंग्लज मूळगावी असणाऱ्या अक्काताई कामात यांचे लग्न झाल्यानंतर त्याला दोन मुले झाली. त्यानंतर पतीचे निधन झाले आणि त्यांचा संसार उघड्यावर आला.
आयुष्यभर कष्ट करून त्यांच्याकडे स्वतःच्या मुलांनी पाहिले नसल्याने आता त्यांच्यावर स्वच्छतागृह करण्याची वेळ आली आहे. यांच्याबरोबर आणखीन दोन महिला आहेत. या महिलांकडे आधार कार्ड आहे ना रेशन कार्ड त्यामुळे त्यांचे जगणे असह्य झाले आहे.
हिवाळा उन्हाळा पावसाळा या तिन्ही ऋतूत या शौचालय जवळ वावरत होत्या. मात्र आता त्या कुठेतरी निघून गेल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्या या परिस्थितीसाठी आता सामाजिक संस्थांनी पुढाकार घ्यावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.
घरदार नसल्याने अनेकांना फुटपाथवर आसरा घ्यावा लागतो. मात्र या महिलांना चक्क स्वच्छतागृहात आपला संसार करावा लागला आहे. त्यामुळे ही बाब समाजहितासाठी सुन्न करणारी ठरणारी आहे. उपाशी राहून त्या जगण्याची धडपड करत आहेत. त्यामुळे आता सामाजिक संस्थांनी त्यांना शोधून अर्थसहाय्य किंवा इतर सहाय्य करावे अशी मागणी जोर धरू लागली आहे.