Monday, December 23, 2024

/

शासनाने तलाव मंजूर करेपर्यंत त्याने घातला एकच शर्ट

 belgaum

इच्छा तेथे मार्ग असे म्हणतात. बेळगाव तालुक्यातील हंदिगनूर गावात राहणाऱ्या 48 वर्षीय ज्योतिबा मनवाडकर यांनी हे सिद्ध करून दाखवले आहे, ज्यानी आपल्या गावात तलाव मंजूर करण्यासाठी एकट्याने लढा दिला आहे.त्याला तीन वर्षे लागली -आणि त्याने आपले ध्येय गाठण्यापर्यंत नवीन शर्ट घालणार नाही अशी शपथ घेतली होती.

मनरेगा मजूर असलेल्या ज्योतिबाला तालुक्यातील वेगवेगळ्या खेड्यांना भेट द्यावी लागत होती. ज्यासाठी त्यांना दररोज 30 किमीहून अधिक प्रवास करावा लागत होता आणि मनरेगाचे बहुतांश उत्पन्न बसच्या भाड्यातच जात असे.बेळगाव live शी बोलताना ज्योतिबा म्हणाले की त्यांनी आपल्या ग्रामस्थांच्या हक्कासाठी लढा देण्याची शपथ घेतली आणि त्यांच्या गावात एक तलाव बांधला गेल्यास 1,200 हून अधिक लोकांना घराच्या जवळ मनरेगाचे काम मिळावे.यासाठी प्रयत्न सुरू केले.

आपल्या ‘शर्टलेस’ व्रताचे स्पष्टीकरण देताना ते म्हणाले, “आमच्या गावात तलाव मंजुरी मिळावी म्हणून मला अनेक कार्यालयात जावे लागले आणि यशस्वी होईपर्यंत मी एकच शर्ट घालायचा निर्णय घेतला. प्रत्येक दुसर्‍या दिवशी किंवा तिसर्‍या दिवशी मी विविध कार्यालयांमध्ये जाऊन येत होतो. एकच शर्ट पुन्हा पुन्हा धुवून वापरत होतो. राज्य सरकारने आमच्या गावात एक तलाव बांधण्यास मान्यता दिली . तेव्हा मी इतर शर्ट घालायला सुरुवात केली आहे. “ते म्हणाले, “गावात बरीच नापीक जमीन होती आणि मी थोडेसे गृहपाठ केले आणि स्वतःची काही रक्कम या प्रक्रियेत खर्च केली. आमच्याच गावात सर्व्हे क्रमांक 204 मधील सुमारे 43.3 एकर जमीन मला मिळाली. 1965 पासून राज्य सरकारच्या नावावर ही जमीन होती. मी तालुका स्तरापासून जिल्हा पंचायत स्तरापर्यंत सर्व अधिकाऱ्यांकडे या संदर्भात संपर्क साधला. ”

Jotiba manwadkar
Jotiba manwadkar with additonal secretary ateek

आमदार सतीश जरकीहोळी यांनी मध्यस्थी केली

“मी मराठा आहे आणि माझ्यासाठी कन्नडमध्ये संवाद साधणे थोडे कठिण आहे. आमचे स्थानिक आमदार सतीश जारकिहोळी यांनी मला यासंदर्भात मदत केली. त्यांनी जिल्हा पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना टाकी मिळण्याची प्रक्रिया स्पष्ट करण्यासाठी सांगितले. तलावसाठी सरकारी जमीन आहे, ” हे त्यांना पटवून द्यावे लागले

ते पुढे म्हणाले, “माझी लढाई 2017 मध्ये सुरू झाली आणि तत्कालीन ग्रामपंचायती पीडीओ आणि इतर सदस्यांनी शेजारची तीन गावे असलेली ग्रामसभा आयोजित करण्यास मदत केली. यात 300 हून अधिक लोक उपस्थित होते, त्यापैकी 294 जणांनी माझ्या बाजूने कौल दिला.केवळ गावकरीच नव्हे तर गावात प्रवेश करणारे वन्य प्राण्यांच्या हितासाठी तलाव बांधण्याच्या बाजूने मतदान केले आणि पुढचे काम सोपे झाले.

ग्रामविकास व पंचायत राज विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव एल.के. अतीक यांनी रविवारी गावाला भेट दिली आणि एका माणसाच्या एकहाती प्रयत्नाने जिंकलेल्या जमिनीवर पाणी साठवण प्रकल्प राबविला.याबद्दल त्याचा सत्कार केला.

स्थानिक नायकाचा सत्कार केल्यानंतर अतीक यांनी ट्वीट केले: “तलाव बांधायला सरकार परवानगी देईपर्यंत आपला शर्ट न बदलणाऱ्या त्या माणसाला भेटा. ज्योतीबाला तलावसाठी जमीन मिळण्यास तीन वर्षे लागली आणि हंदिगनूर ग्रामपंचायतीचा ज्योतिबा मनवाडकर आपल्या नवीन शर्टमध्ये येथे अभिमानाने उभे आहे! ” असे त्यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.