हनुमान नगर प्रेस कॉलनी गटारी नसल्याने समस्या अनेक ठिकाणी लेआउट करण्यात आले आहे. मात्र तिथे योग्य नियोजन नसल्याने आणि नागरिकांना सोयी सुविधा नसल्याने मोठ्या समस्या निर्माण होतात. बेळगाव येथील हनुमान नगर प्रेस कॉलनी येथे अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. नूकतीच पडलेल्या जोरदार पावसामुळे या ठिकाणी पाणी साचून राहिले आहे. त्यामुळे अनेक घरांना धोका उद्भवला आहे.
यासाठी नागरिक धावपळ करत आहेत. वारंवार महानगरपालिकेला सांगून देखील याकडे कानाडोळा करण्यात आला आहे. त्यामुळे ही गंभीर समस्या असून याकडे तातडीने लक्ष देऊन येथील समस्या सोडवाव्यात अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.
बेळगाव मध्ये झालेल्या मुसळधार पावसात अनेक वेगवेगळ्या नवीन समस्या दिसून येत आहेत. त्यामध्ये बेळगाव येथील हनुमान नगर प्रेस कॉलनी मागील वर्षापासून अनेक नागरिक पावसामध्ये वेगवेगळ्या समस्यांना पुढे जावे लागत आहे. तिथे गेल्या काही वर्षापासून गटार बांधकाम नसल्या कारणामुळे साठलेले पाणी हे तेथेच राहून अनेक नागरिकांच्या घरांमध्ये पाणी साचत आहे. यामुळे तेथील नागरिकांबरोबर धोक्याचं वातावरण निर्माण झाले आहे.
मागील वर्षीचा पावसाचा आपण आढावा घेतला असता त्यामध्ये आपणाला गटारी नाले व्यवस्थित रीतीने स्वच्छ नसल्या कारणामुळे अनेक गल्लीबोळात जागी जागी आपल्याला महापूर छायाचित्र दिसून आला आहे. तरी यंदाचं वर्ष हे कोरोनो सारख्या महाभयंकर रोगाच्या संकटातून नागरिक सामना करत आहे.
त्यामध्ये या पावसाळ्यामध्ये नवीन समस्या नागरिकांच्या भीतीचे वातावरण दिसून येत आहे. या पावसाळ्यामध्ये कोरोनो बरोबर डेंगू चिकनगुनिया व मलेरिया सारख्या रोगाबरोबर तरी नागरिकांना याचा सामना करावा लागतो हे मोठे दुर्दैव आहे. याकडे महानगरपालिकेने लक्ष देऊन येथील समस्या सोडवाव्यात अशी मागणी होत आहे.