बेळगाव वनखात्याच्या फॉरेस्ट मोबाईल स्क्वाडने काल गुरुवारी छापा टाकून केलेल्या कारवाईमध्ये पूर्ण वाढ झालेल्या हरणांची 6 शिंगे जप्त करण्यात आली आहेत.
हरणाची ही शिंगे बेकायदेशीररित्या स्वतःजवळ बाळगणारा धारवाड जिल्ह्यातील आरोपी फरारी झाला असून त्याचा शोध जारी आहे. पोलीस उपनिरीक्षक रोहिणी पाटील यांच्या नेतृत्वाखाली फॉरेस्ट मोबाईल स्क्वाडने उपरोक्त छाप्याची कारवाई केली.
या स्क्वाडमध्ये हेड कॉन्स्टेबल यरनाळ भागाई व केडी हिरेमठ यांचा समावेश होता या प्रकरणी गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास सुरू आहे. जप्त करण्यात आलेली हरणाची 6 शिंगे न्यायालयासमोर हजर करून न्यायालयीन आदेशानुसार ती बेळगाव वनखात्याच्या एसीएफ यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली आहेत.