Thursday, December 5, 2024

/

कट्टनभावीत 50 वर्षीय मुंबई रिटर्न दगावला

 belgaum

कट्टनभावी ( ता. बेळगाव) गावातील कोरोना बाधितांची संख्या वाढत असतानाच येथील एका 50 वर्षीय मुंबई रिटर्न इसमाचा शनिवारी सकाळी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. यामुळे गावात एकच खळबळ उडाली असून भितीचे वातावरण पसरले आहे.

मुंबईहून परतलेल्या कट्टनभावी गावातील 5 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे या पद्धतीने गावातील बाधितांची संख्या वाढत असताना 7 दिवसांचे इन्स्टिट्यूश्नल काॅरन्टाईन झालेल्या एका 50 वर्षीय इसमाचा शनिवारी मृत्यू झाला. प्रारंभी सात दिवसाचे इन्स्टिट्यूश्नल काॅरन्टाईन पूर्ण झाल्यानंतर सदर इसमाला घरी जाऊ देण्यात आले होते. मात्र त्यानंतर त्याला पुन्हा त्रास जाणवू लागल्याने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

दुर्दैवाने उपचाराचा फायदा न होता आज शनिवारी सकाळी संबंधित इसमाचा मृत्यू झाला. यामुळे कट्टनभावी गावात खळबळ उडाली असून भितीचे वातावरण पसरले आहे. मयत इसमाने अहवाल चाचणीसाठी पाठवण्यात आला असून अद्याप अहवाल येणे बाकी आहे. त्याचा मृत्यू कोरोनाने झाला असल्यास बेळगावातील कोरोनाचा हा दुसरा बळी ठरणार आहे यापूर्वी हिरेबागेवाडी येथील वृद्धेचा मृत्यू झाला होता मृत्यू नंतर कोरोना मुळे ती मयत झाल्याचे स्पष्ट झाले होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.