बेळगाव जिल्हा प्रशासनाचे अधिकाऱ्यांनी भात पेरलेल्या जमिनीत सांडपाणी प्रकल्पासाठी बुलडोझर फिरवल्याने शेतकरी आणि अधिकारी यांच्यात संघर्ष निर्माण झाला होता त्यामुळे वातावरणात तणावपूर्ण झाले होते.
अलारवाड क्रॉस जवळील सुपीक जमिनी सांडपाणी प्रकल्पासाठी बळकावली जात आहे याला कर्नाटक उच्च न्यायालयात स्थगिती असून देखील पोलीस आणि प्रशासन दडपशाही करत असल्याचा आरोप शेतकरी यांनी केला आहे.
हलगा येथील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाला पोलीस बंदोबस्तात सोमवारी सकाळी प्रारंभ झाला.सकाळी मनपा अधिकारी पोलिसांसह नियोजित प्रकल्पस्थळी दाखल झाले.त्यावेळी पन्नासहून अधिक शेतकऱ्यांनी त्यांना विरोध दर्शविला.शेतात भात पेरणी केली आहे.सध्या कामाला प्रारंभ करू नका असे सांगून शेतकऱ्यांनी विरोध केला.मनपा अधिकारी शेतकरी संघटनेच्या पुढाऱ्यांमध्ये यावरून जोरदार शाब्दिक चकमक झडली.पण मनपा अधिकाऱ्यांनी विरोधाला न जुमानता कामाला प्रारंभ केला.
केंद्र सरकारच्या योजनेतून हा 160 रु चा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.2016 मध्ये कामाला प्रारंभ होणार होता पण शेतकऱ्यांच्या विरोधामुळे कामाला प्रारंभ होऊ शकला नाही.टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली असून आता प्रकल्प लवकर पूर्ण करण्याची मनपाची योजना आहे