गेल्या आठवड्यात बटाटे लागवड केल्यानंतर मुसळधार पाऊस झाल्याने लागवड केलेले बटाटा बियाणे कुजल्याने गोजगा येथील शेतकऱ्याने शेतातील झाडाला गळफास लावून आत्महत्या केली आहे.
अशोक कृष्णा बामणे वय 59 रा. गोजगा असे या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.शनिवारी सकाळी ही घटना उघडकीस आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काल शुक्रवारी शेताकडे जाऊन लागवड केलेले बटाटे पाहून आल्यापासून ते निराश होते, परत सकाळी उठून शेताकडे जाऊन आल्यानंतर बियाणे कुजल्याने नैराश्येतून शेतातीलच झाडाला गळफास लावून घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.
मयत शेतकऱ्याच्या पश्चात्य यांच्या पश्चात्य आई,पत्नी,दोन भाऊ, दोन मुले आहेत.
या घटनेची नोंद काकती पोलीस स्थानकात झाली असून उत्तरणीय तपासणी नंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.एकीकडे कोविड मुळे आलेलो आर्थिक मंदी तर दुसरीकडे पिकांचे नुकसान यामुळे अश्या घटना होत असून शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी केली जात आहे.