कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून काल सायंकाळीनंतर राज्यात आणखी 337 रुग्ण आढळून आल्यामुळे राज्यातील कोरोनेबाधितांची एकूण संख्या 8,281 इतकी झाली आहे. त्याचप्रमाणे 5,210 रुग्णांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. बेळगाव जिल्ह्यात गेल्या 24 तासात एक रुग्ण आढळून आल्यामुळे रुग्णांची संख्या 308 इतकी झाली आहे.
राज्याच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केलेल्या कोरोना वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार गुरुवार दि. 18 जून सायंकाळी 5 वाजल्यापासून आज शुक्रवार दि. 19 जून 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत राज्यात नव्याने 337 कोरोनाग्रस्त रुग्ण सापडले आहेत. नव्याने आढळलेल्या रुग्णांमध्ये 11 आंतरराष्ट्रीय, तर 93 आंतरराज्य प्रवाशांचा समावेश आहे. राज्यात ॲक्टिव्ह केसेस 2,943 असून यापैकी 78 जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. गेल्या 24 तासात 230 जणांना डिस्चार्ज देण्यात आल्यामुळे हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची एकूण संख्या 5,210 इतकी झाली आहे. कोरोनामुळे आणखी 10 जणांचा मृत्यू झाल्याने राज्यातील मृतांची संख्या 124 झाली असून यापैकी चौघांच्या मृत्यूचे कारण नॉन – कोव्हीड आहे.
*बेळगावात एक जण पॉझिटिव्ह*
बेळगाव शहरात हुबळी -धारवाड आंतर जिल्हा प्रवास इतिहास असणारा एक जण आज शुक्रवारी कोरोना बाधित आढळून आला आहे. सदर पी -7945 क्रमांकाच्या 42 वर्षीय इसमाला बीम्स हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हा नवा रुग्ण सापडल्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 308 झाली आहे. त्याचप्रमाणे हॉस्पिटलमधील एका रुग्णाला अतिदक्षता विभागात हलविण्यात आले आहे. आरोग्य खात्याच्या प्रसिद्धी पत्रकानुसार आज शुक्रवारी 8 जणांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आल्यामुळे जिल्ह्यात डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकूण रुग्णांची संख्या 279 झाली आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या आता 28 वर आली आहे.