शेकडो कामगारांनी मजगावं येथील कामगार उपायुक्त कार्यालयास घेराव घालून जाब विचारताच उर्वरित 28 हजार कामगारांना 8 दिवसाच्या आत कोविड रिलीफ मदत देण्याचे आश्वासन कामगार उपायुक्त वेंकटेश यांनी दिले आहे.
मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा यांनी कोविड काळात 24 मार्च रोजी प्रत्येक कामगाराला पाच हजार रुपये सरकारी मदत देण्याचे जाहीर केले होते त्यापैकी बेळगाव जिल्ह्यात 52 हजार कामगारांनी याचा लाभ घेतला आहे तर 28 हजार कामगार यापासून वंचित होते अश्या शेकडो संतप्त कामगारांनी मजगाव येथील लेबर ऑफिस समोर निदर्शन केली.
शनिवारी सायंकाळी मजगावं येथील कामगार खात्याच्या कार्यालयास वकील एन आर लातूर आणि माजी जिल्हा पंचायत सदस्य नागेश देसाई यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कामगारांनी कामगार कार्यालयास घेराव घातला व अधिकाऱ्यांना जाब विचारला.
28 हजार कामगारांना आगामी 8 दिवस प्रत्येकी पाच हजार अशी मदत वितरण केली जाईल या शिवाय गेल्या दोन वर्षा पासून प्रलंबित असलेल्या लग्न स्कॉलरशिप कामगार मदत दोन आठवड्यात देण्याचे आश्वासन देखील लेबर अधिकाऱ्यांनी दिले यावेळी.
सहाय्यक लेबर आयुक्त नागेश जिल्हा कामगार अधिकारी नागेश,मल्लिर्जुन,सनरम बेनगली उपस्थित होतेकामगारांच्या वतीनं सुनील गावडे महेंद्र घोडके यशवन्त लमानी रोहित लातूर ज्ञानेश्वर भातकांडे आदी उपस्थित होते.