बेळगाव डिसीसी बँकेची निवडणूक घेण्याचे सरकारने ठरवले आहे.यासाठी रिटर्निंग ऑफिसर म्हणून बिम्सच्या प्रशासकीय अधिकारी सईदा आफ्रिन एस बळारी यांची नियुक्ती केली आहे.
सहकार खात्याच्या आयुक्तांनी सदर आदेश जारी केला आहे.यापूर्वी रिटर्निंग ऑफिसर म्हणून जयश्री शिंत्री यांची नेमणूक केली होती पण आता नवा आदेश काढून सईदा आफ्रिन एस बळारी यांची नेमणूक केली आहे.
ऑगस्ट महिन्यात डिसीसी बँकेची निवडणूक होणार आहे.डिसीसी बँकेच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील राजकारणी बँक आपल्या ताब्यात राहावी यासाठी मोर्चेबांधणी करत आहेत.बँकेच्या निवडणुकीमुळे जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघणार आहे.
जुलै 30 -उमेदवारी अर्ज भरणे
जुलै 31- अर्जाची अर्जाची छाननी करणे
1 आगष्ट-अर्ज माघारीची अंतिम तारीख
7 आगष्ट निवडणूक