मोठा गाजावाजा करून गोगटे सर्कल जवळील रेल्वे ओव्हर ब्रिजचे उदघाटन करण्यात आल होते मात्र गेल्या दोन वर्षात सदर ब्रिज अनेकदा दुरुस्त करण्यात आला आहे या ब्रिजची दुरुस्ती केवळ चार महिन्यापूर्वी झाली असताना पुन्हा एकदा ब्रिजच्या सुमार कामाचा दर्जा समोर आला आहे.
ब्रिज वर सुरुवातीच्या काळात गार्डन बरोबरच आकर्षित पथदीप बसवण्यात आले. मात्र वर्ष दीड वर्षातच या पद्धतीत त्यांची अवस्था असून अडचण नसून खोळंबा अशी झाली आहे.
सध्या रेल्वे ओव्हरब्रिज जवळ एक पथदिप वाकला आहे वाकलेला पथदीप धोकादायक असून कोणत्याही क्षणी कोसळू शकतो त्यामुळे हा पथदीप दुरुस्त करण्याची मागणी वाहन चालकातून व्यक्त होत असून दुरुस्त करण्याकडे दुर्लक्ष झाल्याने संताप देखील व्यक्त करण्यात येत आहे. रेल्वे प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहून पथदीप दुरुस्त करण्याची गरज व्यक्त होत आहे.
या रेल्वे ओव्हर ब्रिजवरून मोठ्या प्रमाणात वाहतूक
असते. त्यामुळे अचानक हा पथदीप कोसळला तर कोणालाही इजा होऊ शकते. हा अपघात टाळण्यासाठी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.
उद्घाटनाच्या वेळी रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांनी मोठा गाजावाजा केला होता. मात्र आता या रेल्वे उड्डाण पुलाकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते आहे. तेव्हा रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांनी हा पथदीप दुरुस्त करण्यासाठी स्वतः पुढाकार घ्यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. हा पथदिप मागील वर्ष दीड वर्ष पूर्वीच बसविण्यात आला होता तो खराब झाल्याने निकृष्ट दर्जाचे काम झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कोट्यावधी खर्च करून देखील नागरिकांच्या पदरी केवळ निराशाच येत असल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.