कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेला लाॅक डाऊन शिथिल केल्यानंतर जवळपास 2 महिन्यांनी बेळगाव येथील न्यायालयीन कामकाज सोमवारपासून सुरू झाले.
बेळगाव येथील न्यायालयीन कामकाज सोमवारपासून सुरू झाले असले तरी सामाजिक अंतराचे भान बाळगणे महत्त्वाचे असल्याने न्यायालयात फक्त न्यायाधीश आणि वकीलांनाच प्रवेश देण्यात आला.
यासाठी न्यायालय आवारात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पक्षकारांना न्यायालयापासून कांही अंतरावर थांबवूण ठेवण्यात आले होते. न्यायालयात प्रत्येकानी सामाजिक अंतराचे भान राखत मास्क लावूनच प्रवेश केला.
न्यायालय आवारात सकाळी दहाच्या सुमारास फारशी वर्दळ नव्हती, परंतु हळूहळू पक्षकारांची ये – जा सुरू झाली. पक्षकार आपल्या वकिलांशी चर्चा करून आपल्या खटल्याबद्दल माहिती जाणून घेत होते. न्यायालयाचे कामकाज सुरळीतपणे सुरू झाल्याने पक्षकार आणि वकील दोघांनाही हायसे वाटले आहे. दरम्यान, वकील व पक्षकारांनी मास्क आणि सामाजिक अंतराचे भान बाळगणे आवश्यक आहे, अशा सूचना करण्यात आली आहे.