राजकारण हे कधी केव्हा कुणासाठी कशासाठी खेळले जाईल सांगता येत नाही. त्यामुळे राजकारणात पाऊल ठेवताना 100 वेळा विचार करावा रे बाबा अशी म्हण प्रचलित आहे. कोणत्याही कारणात राजकारण घुसडण्यात राजकारणी हुशार असतात. तर एखाद्या मृत झालेल्या या ठिकाणीही राजकारण दिसून येते. आता असाच प्रकार कोरोना सारख्या महाभयंकर महामारीमध्येही दिसून येत आहे.
परराज्यातून येणाऱ्या आणि जुना राग मनात ठेवून काही तरुणांना पॉझिटिव्ह असल्याचे सांगून राजकारण खेळण्याचा प्रकार तालुक्यात घडत आहे. त्यामुळे अनेकांतून संताप व्यक्त होत असला तरी अशा परिस्थितीत देखील कोरोनाचे राजकारण आणि राजकारणाचा कोरोना होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे तालुक्यात एकच चर्चा सुरू आहे. अनेक ठिकाणी असेच प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहेत.
त्यामुळे राजकारण कर्त्याना राजकारण केव्हा खेळावे हे ही सांगणे कठीण आहे. त्यामुळे सध्या उद्भवलेल्या परिस्थितीत राजकारण्यांनी राजकारण सोडून नागरिकांच्या आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे अनेक जण कोरोना सारख्या महाभयंकर रोगाला थोपवण्यासाठी प्रयत्न करत असताना राजकारणी मात्र स्वतःची पोळी भाजून घेण्यातच धन्यता मानत असून काही लोकप्रतिनिधींनी चक्क धमकावल्याचा घटनाही उघडकीस येत आहेत.
त्यामुळे हे राजकारण कोरोना काळात तर नको रे बाबा असे म्हणण्याची वेळ आली आहे. आता याचा गांभीर्याने विचार होण्याची गरज असून राजकारण न करता नागरिकांच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे, असे जाणकारांतून बोलले जात आहे.