मान्सून पूर्व पावसाने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. याला बेळगाव तालुका ही अपवाद नाही. यामुळे अनेक रस्त्यांची वाताहत झाली आहे. बेळगाव -पणजी हा महामार्ग देखील चिखलाने माखला असून या रस्त्यावरून प्रवास करणे जिकीरीचे बनत आहे. त्यामुळे हे काम तातडीने करण्याची मागणी या परिसरातील नागरीकातून होत आहे.
बेळगाव-पणजी हा मुख्य गोव्याला जोडणारा महामार्ग आहे. या मार्गावरून दररोज हजारो प्रवासी प्रवास करत असतात. मात्र पहिल्याच पावसात या रस्त्यावरून जाणाऱ्यांना धोक्याचे ठरत आहे. मागील चार दिवसांपासून पडलेल्या पावसामुळे संपूर्ण वाहतूक झाल्याचे दिसून येत आहे. चिखलाने माखलेले या रस्त्यावरून प्रवास करताना अनेकांना भीती वाटू लागली आहे. मुख्य महामार्ग असला तरी हा रस्ता चिखलमय बनला आहे.
मागील वर्षभरापासून हे काम सुरू आहे. मात्र ते काम पूर्ण करण्याकडे कंत्राटदारांना दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. याचा फटका प्रवाशांना सहन करावा लागत आहे. यासंबंधी परिसरातील नागरिकांतून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. बेळगाव-पणजी महामार्ग लवकरच पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले होते.
मात्र अद्यापही या रस्त्याचे काम पूर्ण झाले नसल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. या रस्त्यावर पावसामुळे चिखल झाला आहे. त्यामुळे प्रवास करताना अनेकांच्या अंगावर हा चिखल उडवून कपडे चिखलमय होत असल्याचा प्रकार दिसून येत आहे. हा रस्ता तातडीने पूर्ण करावा व चिखलाने माखलेल्यावर खडी किंवा डांबरीकरण तातडीने करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.