कोरोना रुग्णांना देण्यात येणाऱ्या आहारात झुरळ सापडल्याचे वृत्त बेळगाव लाईव्हने दिले होते.सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला होता.त्याची दखल घेऊन जिल्हाधिकारी डॉ एस बी बोमनहळ्ळी यांनी बिम्स रुग्णालयातील किचनवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष अधिकाऱ्याची नेमणूक केली आहे.
आहार आणि नागरी पुरवठा खात्यातील एका अधिकाऱ्याला भोजनाच्या व्यवस्थेची पाहणी करण्यासाठी नियुक्त केले आहे.या अधिकाऱ्याकडे कोरोना रुग्णांना देण्यात येणाऱ्या आहाराची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
कोरोनाबाधित रुग्णांनी तीन दिवसांपूर्वी आहारात झुरळ सापडलेला व्हीडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता.केवळ झुरळच नव्हे तर मुंग्या आणि अन्य कीटक आहारात अनेक वेळा आढळून आल्याची तक्रार केली होती.इतकेच नव्हे तर भोजन देखील वेळेवर दिले जात नाही अशी तक्रार केली होती.या सगळ्याची दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोना रुग्णांना दिल्या जाणाऱ्या आहाराच्या दर्जावर लक्ष ठेवण्यासाठी विशेष अधिकारी नियुक्त केला आहे.
बेळगाव Live ने जिल्हा रुग्णालयात कोरोना रुग्णांना देण्यात येणाऱ्या जेवणात झुरळ आढळल्याचा व्हीडिओ प्रसारित केला होता बातमी देखील सर्वप्रथम घातली होती शासकीय दरबारी देखील बेळगाव Live वृत्ताची दखल घेण्यात आली आहे.
7 जून रोजी कशी घातली होती बेळगाव Live ने बातमी व्हीडिओ पहा अन बातमी वाचा खालील लिंक मध्ये
बिम्स इस्पितळातला धक्कादायक प्रकार-कोरोना रुग्णांच्या जेवणात चक्क झुरळ-रविवारी दुपारचा व्हीडिओ व्हायरल पहा खालील…
Posted by Belgaum Live on Sunday, June 7, 2020