कर्मचाऱ्याच्या पतीला कोरोना त्यामुळे सीएम निवासी कार्यालयाचे विधान सौधमध्ये स्थलांतर झाले आहे.मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातील एका कॉन्स्टेबल महिला कर्मचार्याचा पती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यामुळे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांचे “कृष्णा” या निवासस्थानातील कार्यालय शुक्रवारी विधान सौधमध्ये हलविण्यात आले आहे.
संबंधित महिला कर्मचाऱ्यांचा पती कोरोना बाधित आढळून आल्यानंतर तिला दोन दिवस कामावर येण्यास मनाई करण्यात आली आहे.
दरम्यान संबंधित कॉन्स्टेबल महिला कर्मचारी आऊट पोस्ट ड्युटीवर असल्यामुळे ते मुख्यमंत्री अथवा अन्य कोणत्याही मंत्री किंवा अधिकाऱ्यांच्या संपर्कात आलेली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. कोरोनामुळे अनेक मंत्र्यांनी ताफेच्या ताफे बदलले होते आता येडीयुरप्पा यांनी कार्यालय हलवले आहे.शुक्रवारी राज्यात 337 नवीन कोरोना रुग्ण सापडले त्यातील बंगळुरू मध्ये 138 रुग्ण एका दिवसात आढळले आहेत.