सुवर्ण सौधमध्ये कर्नाटक माहिती आयोगाच्या बेळगाव पीठाचे कार्यालय सुरू करण्यात आले आहे.आयोगाचे बेळगाव पीठाचे कार्य 3 मार्चपासून सुरू होणे आवश्यक होते पण कोरोनाच्या संकटामुळे त्याला उशीर झाला.पिठाच्या न्यायालयीन कामकाजाला 22 मार्च पासून प्रारंभ होणार आहे अशी माहिती आयोगाच्या आयुक्त बी व्ही गीता यांनी दिली.
बेळगाव पिठाच्या अखत्यारीत एकूण सात जिल्हे आहेत.सध्या आयोगाकडे चार हजार प्रकरणे प्रलंबित आहेत.बेळगाव,धारवाड,विजापूर,बागलकोट,गदग, हावेरी आणि उत्तर कन्नड जिल्हे आयोगाच्या अखत्यारीत येतात.
सुवर्ण सौधमध्ये कार्यालय सुरू झाल्यामुळे कामानिमित्त तेथे जाणाऱ्या लोकांची सोय व्हावी म्हणून दिवसातून तीन वेळा बससेवा सुरू करण्यात आली आहे.