Sunday, December 29, 2024

/

ब्रीडर्स आणि पेट शॉप्सनी तात्काळ नोंदणी करून घ्यावी – डॉ.सरनोबत

 belgaum

बेळगाव शहरातील पशु प्रजनक (ब्रीडर्स) आणि पाळीव प्राणी विक्री व खाद्य दुकान (पेट शॉप) चालकांनी तात्काळ आपली अधिकृत नोंदणी करून घ्यावी. आम्ही या पदावर आहोत ते फक्त नांवासाठी नाहीतर प्राण्यांच्या कल्याणाबरोबरच पशुसंवर्धन व वैद्यकीय खात्याचा शहरवासीयांना चांगला लाभ व्हावा यासाठी आहोत, असे कर्नाटक पशु कल्याण मंडळाच्या सदस्य डाॅ. सोनाली सरनोबत यांनी सांगितले.

बेळगाव जिल्हा पशूसंवर्धन आणि कल्याण खात्यातर्फे पशू प्रजनक (ब्रीडर्स) तसेच पाळीव प्राणी विक्री आणि खाद्य दुकानाची अधिकृत नोंदणी तसेच अन्य विषयांसंदर्भात आयोजित बैठक नुकतीच पार पडली. याप्रसंगी डॉ सोनाली सरनोबत बोलत होत्या. सदर बैठकीस जिल्हा पशु संवर्धन आणि कल्याण खात्याचे उपसंचालक नाडगौडा यांच्यासह कर्नाटक पशु कल्याण मंडळाचे सदस्य शिवानंद डंबळ व पशूप्रेमी माजी महापौर शिवाजी सुंठकर व्यासपीठावर उपस्थित होते. बेळगाव शहरातील पशू प्रजनक (ब्रीडर्स) आणि पाळीव प्राणी विक्री दुकानांची पशुसंवर्धन आणि कल्याण मंडळाकडे अद्याप अधिकृत नोंदणी झालेली नाही. याबाबत बैठकीत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच संबंधितांनी तात्काळ आपली अधिकृत नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले.

याप्रसंगी बोलताना डॉ. सोनाली सरनोबत पुढे म्हणाल्या की, पेट शॉपमध्ये पशुखाद्यची विक्री करणे चुकीचे आहे. त्या ठिकाणी फक्त पाळीव प्राण्यांचे खाद्य विक्रीस उपलब्ध केले जावे. यासाठी कायदे कांही कायदे आणि नियम आहेत, त्याचे पालन करून संबंधितांनी रीतसर परवानगी घेतली पाहिजे. पेट शॉप चालकांनी त्यांच्या दुकानात येईल कुत्री, मांजरे, पक्षी, कासव आदी प्राण्यांची कायद्यानुसार नोंदणी केली पाहिजे. अॅनिमल वेल्फेअर बोर्डाच्या साइटवर या संदर्भातील माहिती उपलब्ध आहे त्यानंतरही काही समस्या असल्यास संबंधित आणि ॲनिमल वेल्फेअर बोर्डच्या कार्यालयात यावे, याठिकाणी तुमच्या मदतीसाठी लोक आहेत ते तुम्हाला मार्गदर्शन करतील. थोडक्यात कोणत्याही परिस्थितीत तुम्ही आपल्या व्यवसायाची अधिकृत नोंदणी केली पाहिजे, असे सरनोबत यांनी स्पष्ट केले.

Dr sonali sarnobat
Dr sonali sarnobat

शहरातील बहुतांश ब्रीडर्स हे आपल्या घरांमध्येच ब्रीडिंग करतात त्या सर्वांची माहिती माझ्याकडे आहे. ब्रीडिंगची क्वालिटी आणि एसओपी व्यवस्थित असला पाहिजे. तथापि शहरातील ब्रीडर्सकडून एसओपीचे उल्लंघन केले जात आहे हे चुकीचे आहे. तुम्ही तुमचा व्यवसाय व्यवस्थित करा परंतु तो कायदेशीर असला पाहिजे, असे डॉ सोनाली सरनोबत म्हणाल्या. लाॅक डाऊनच्या काळात काही बिगर सरकारी संघटनांनी मुक्या प्राण्यांना जीवदान देण्याचे जे कार्य केले त्याबद्दल त्यांना धन्यवाद देऊन डाॅ. सरनोबत यांनी संबंधित संघटनांना ॲनिमल शेल्टर त्याबाबतीत सूचित केले.

कर्नाटक पशु कल्याण मंडळाचे सदस्य शिवानंद डंबळ यांनी देखील आपले मार्गदर्शनपर विचार व्यक्त केले. त्याचप्रमाणे शहरातील पेट शॉप चालकांनी आपापली दुकाने स्वच्छ आणि हवेशीर ठेवावीत सध्याच्या कोरोना प्रादुर्भावाचा परिस्थिती दुकानातील प्राणी आणि ग्राहकांच्या दृष्टीकोनातून आवश्यक खबरदारी घ्यावी तसेच येत्या सात दिवसात आपल्या कांही तक्रारी असतील त्या मंडळाकडे सादर कराव्यात तसेच आपापली अधिकृत नोंदणी या सात दिवसात करून घ्यावी, असे आवाहन डंबळ यांनी केले.

बैठकीस शहरातील पशू प्रजनक (ब्रीडर्स) तसेच पाळीव प्राणी विक्री आणि खाद्य दुकानदार उपस्थित होते. त्यांच्या शंकांचे यावेळी निरसन करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.