बेळगाव शहर तसेच परिसरात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साठून राहिले आहे. तर तालुक्यातील अनेक शेतवाडीतील बांध फुटले आहेत. या पावसामुळे सर्वत्र हाहाकार माजला आहे.
शहरात देखील मुसळधार पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली.सकाळच्या वेळी पावसाला सुरुवात झाल्यामुळे भाजी विक्रेत्यांची गडबड उडाली.पावसापासून बचाव करताना विक्रीसाठी आणलेला भाजीपाला देखील काढून बाजूला सुरक्षित ठेवताना धांदल उडाली.दुपारी आलेल्या पावसामुळे तर परगावाहून बाजारपेठेत मोठ्या खरेदीसाठी आलेल्या व्यक्तींना पावसापासून वाचण्यासाठी आडोसा शोधावा लागला.अनेक ठिकाणी गटारी तुंबल्यामुळे रस्त्यावरून पाणी वाहत होते.लेंडी नाला फुटल्यामुळे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
बेळगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी झाडे कोसळून घरांचे नुकसान झाले आहे तर शेतातील बांध फुटून देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। त्या परिस्थितीत हांदिगणुर कडोली उचगाव यासह इतर येळ्ळूर भागात मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावली आहे. काही ठिकाणी धुळ वाफ पेरणी करण्यात आली होती.
त्या पिकांना हा पाऊस पोषक ठरला आहे. तर पेरणीसाठी हा पाऊस पोषक ठरला आहे. दरम्यान हा पाऊस आणखी बरसणार की काय असा प्रश्न शेतकऱ्याचं उपस्थित करण्यात येत आहे. मात्र सध्या पडलेल्या पावसामुळे साऱ्यातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. वाढलेल्या उष्मा कमी करून गारवा निर्माण करण्यासाठी हा पाऊस पोषक ठरला आहे.