Friday, December 20, 2024

/

यल्लम्मा आणि मायक्का देवस्थानात 30 जून पर्यंत भक्तांना नो एंट्री

 belgaum

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सौंदत्ती यल्लमा आणि चिंचली येथील मायक्का देवीचे मंदिर 30 जूनपर्यंत बंद ठेवले जाणार आहे.जिल्हाधिकारी डॉ एस बी बोमनहळ्ळी यांनी सदर आदेश बजावला आहे.

सौंदत्ती यल्लमा आणि रायबाग तालुक्यातील चिंचली मायक्का येथे दर्शनासाठी केवळ कर्नाटक नव्हे तर महाराष्ट्र आणि अन्य राज्यातून भक्त दर्शनासाठी येतात.

महाराष्ट्रात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे.त्यामुळे सार्वजनिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो.यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून ही दोन मंदिरे 30 जून पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.मंदिरे बंद असली तरी मंदिरातील पूजा आणि धार्मिक विधी करण्यात येत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.