मंगळवार 2 जुन चे राज्य आरोग्य खात्याचे मेडिकल बुलेटिन बेळगावसाठी विस्फोटक ठरले असून या बुलेटिन मध्ये गेल्या 70दिवसाच्या लॉक डाऊन मधील मोठा आकडा आला आहे.एका दिवसात तब्बल 51कोरोनो पॉजिटीव्ह रुग्ण सापडले आहेत. बेळगाव जिल्ह्याचा आकडा दोनशे पार झाला आहे बेळगावात एकूण राज्य मेडिकल बुलेटिन अनुसार 211 रुग्ण झाले आहेत.
राज्यात मंगळवारी 388 इतके रुग्ण सापडले असून हा आकडा देखील वाढत 3796 झाला आहे आजच्या नवीन मिळालेल्या रुग्णांत देखील महाराष्ट्र रिटर्न रुग्णांचा आकडा लक्षणीय आहे.
बेळगावात कोरोनाचे डबल सेंच्युरी मारली असून जी गावे कोरोना फ्री म्हणून समजली जात होती त्या गावातच कोरोनाचे रुग्ण आढळल्याने खळबळ माजली आहे.विशेष म्हणजे बेळगाव शहराच्या चारही दिशांना असलेल्या खेड्यामध्ये कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत त्यामुळे बेळगाव शहराला चारही बाजूनी कोरोना ग्रस्त असलेल्या खेड्यानी विळखा घातला आहे.
बेळगाव तालुक्यातील पश्चिम भागातील अतवाड, उचगाव,सुळगा,सावगाव तर पूर्व भागातील मुतगा सांबरा आणि बाळेकुंद्री येथे मोठ्या संख्येने पोजिटिव्ह रुग्ण आढळले आहेत या अगोदर तुरमुरी, अगसगे, माळेनट्टी या गावात रुग्ण सापडले होते त्यामुळं शहराजवळ असलेली ही सगळी गावे कंटेनमेंट झोन होणार आहेत.
बेळगावात मिळालेल्या 50 रुग्णांत
26 यमकनमर्डी
16 बेळगाव तालुक्यातील विविध गावात
01गोकाक
01 मुडलगी इतके रुग्ण आहेत.