belgaum

उद्यापासून दररोज धावणार बेळगाव – बेंगलोर सुपरफास्ट एक्सप्रेस!

0
995
Railway
 belgaum

भारतीय रेल्वे बोर्डाने केएसआर बेंगलोर (एसबीसी) – बेळगाव – बेंगलोर (एसबीसी) या डेली सुपरफास्ट एक्सप्रेस रेल्वे गाडीच्या सुधारित वेळापत्रकाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे ही रेल्वेगाडी आता त्रैसाप्ताहिक ऐवजी दररोज धावणार असून याची अंमलबजावणी आज 26 जून रोजी बेंगलोर येथून आणि उद्या शुक्रवार दि. 27 जून रोजी बेळगाव येथून होणार आहे. त्याचप्रमाणे या सुपरफास्ट रेल्वे गाडीचा क्र. 06549/06550 असा बदलण्यात आला आहे.

सदर केएसआर बेंगलोर (एसबीसी) – बेळगाव – बेंगलोर (एसबीसी) डेली सुपरफास्ट एक्सप्रेस रेल्वेगाडी केएसआर बेंगलोर आणि बेळगाव येथून रोज रात्री 9 वाजता सुटणार असून दुसऱ्या दिवशी सकाळी 7.25 वाजता दोन्ही ठिकाणी तिचे आगमन होणार आहे.

बेळगाव येथून या सुपरफास्ट रेल्वेचे थांबे आणि वेळापत्रक अनुक्रमे कंसात आगमन आणि प्रस्थानाची वेळ पुढीलप्रमाणे आहे. बेळगाव (09.00), धारवाड (23.10/23.11), हुबळी (23.45/23.50), करजगी (01.10/टी), हावेरी (01.05/01.06), राणीबेन्नूर (01.34/01.35), हरिहर (01.53/01.54), दावणगिरी (02.08/02.10), चिकजाजुर (02.49/02.50), बिरूर (03.50/03.51), अरसीकेरी (04.30/04.35), संपगे रोड (05.35/टी), तुमकुर (06.10/06.11), यशवंतपुर (07.05/07.06), केएसआर बेंगलोर (07.25).

 belgaum

केएसआर बेंगलोर येथून या सुपरफास्ट रेल्वेचे थांबे आणि वेळापत्रक अनुक्रमे कंसात आगमन आणि प्रस्थानाची वेळ पुढीलप्रमाणे आहे. केएसआर बेंगलोर (21.00), यशवंतपुर (21.09/21.10), तुमकुर (21.59/22.00), संपगे रोड (22.50/टी), अरसीकेरी (23.15/23.20), बिरूर (23.55/23.56), चिकजाजुर (00.50/00.51), दावणगिरी (01.35/01.37), हरिहर (01.52/01.53), राणीबेन्नूर (02.13/02.14), हावेरी (02.45/02.46), करजगी (03.15/टी), हुबळी (04.05/04.10), धारवाड (04.31/04.32), बेळगाव (07.25).

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.