संपूर्ण देशात लॉकडाऊन परिस्थिती निर्माण झाली असताना अनेकांना आर्थिक फटकाही सहन करावा लागनला आहे. अशाच अडचणीत सापडलेल्या केदनूर तालुका बेळगाव येथील एका शेतकऱ्याने आत्महत्या करून घेतल्याची घटना उघडकीस आली आहे. सोमवारी ही घटना उघडकीस आली असून झाडाला दोरी घेऊन त्याने आपले जीवन संपविले आहे.
कोरोना महामारी दरम्यान लॉकडाऊनमुळे उद्भवणारे आर्थिक संकट बर्याच लोकांचा बळी घेत आहे. शेतात पिकलेल्या मालाला योग्य हमीभाव मिळाला नसल्याने त्याने आपले जीवन संपविले आहे. वारंवार शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रकार वाढू लागले आहेत. कोरोना काळात अनेक शेतकऱ्यांचे पीक वाया गेले आहे तर काहीजणांनी तर ट्रॅक्टर फिरविला आहे. केदनूर येथील 62 वर्षीय
आप्पय्या नागाप्पा राजाई या शेतकऱ्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
कौटुंबिक सूत्रांनी दिलेल्या माहीतीनुसार पिकवलेल्या भाज्यांना योग्य हमीभाव मिळाला नसल्याने तसेच त्याच्यावर कर्ज असल्याने त्याने आत्महत्या केली आहे. अपया हे वारकरी होते. वारकरी समूहातील ते प्रमुख सदस्य असल्याने अप्पय राजाई यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला जात आहे.
गेल्या चार दिवसांत बेळगाव तालुक्यातील दुसरा असा शेतकरी आहे ज्याने आत्महत्या केली आहे