एक राजकारणी आणि सध्या आमदार असलेला मुद्देबिहाळ येथील आमदार वाय एस पाटील नाडीहळ्ळी यांची आपल्या मतदारसंघातील व्यक्तींप्रति नाळ किती जुळली आहे याचा अनुभव आला. गोव्याहुन मुद्देबिहाळ ला येणाऱ्या कामगारांची वाट बघत हे आमदार महाशय वाट बघत राहिले.
आमदारांची परवानगी घेतल्याशिवाय बिल्डिंग बांधायची नाही, जागा खरेदी करायची नाही असे बेळगाव सारख्या इतर मतदारसंघात वातावरण असताना या आमदारांचे कौतुक होत आहे.
चोरला खानापूर चेक पोस्ट वर हे आमदार आपल्या मतदार संघातील नागरिकांची वाट बघत रात्रभर उभे होते. शनिवारी रात्री गोव्यातून हे नागरीक येणार होते. हे वागणे एक आमदाराच्या दृष्टीने दुर्मिळ आहे, याची चर्चा राज्यभर झाली. आजपर्यंत आमदार म्हणजे फुकटचा रुबाब आणि काम करणाऱ्यांपेक्षा अडचणी जास्त असा अनुभव असलेल्या बेळगाव जिल्ह्यातील नागरिकांना हा अनुभव वेगळाच होता. एक आमदार आपल्या लोकांची वाट बघत थांबला असताना त्यांच्या डोळ्यात उपकाराची नव्हे तर कर्तव्याची भावना आहे हे बघून नागरिक धन्य झाले.
गोव्यातून आलेल्या 350 कामगारांचे त्यांनी स्वागत केले आणि त्यांना सुरक्षित घेऊन गेले. आमदार असा मदत करणारा असावा अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.