हिरेबागेवाडी होणार लवकरच कंटेनमेंट झोनपासून मुक्त बेळगाव तालुक्यातील हिरेबागेवाडी येथे कोरोना रुग्णाची संख्या वाढत होती. मात्र आता ती काही अंशी थांबले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने हे गाव कंटेनमेंट झोनपासून मुक्त करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. याबाबतची घोषणा लवकरच करण्यात येणार आहे. सध्या या गावात कोरोना बाधितांची संख्या 20 हून अधिक सापडल्याने हे गाव रेड झोन’मध्ये टाकण्यात आले होते.
आता या गावातील रुग्ण बरे होत आहेत. तर एका 80 वर्षीय वृद्धेचा देखील मृत्यू झाला आहे. त्या दृष्टिकोनातून या गावाला मागील दोन महिन्यापासून रेड झोन’मध्ये टाकण्यात आले होते. आता पुन्हा हे गाव कंटेनमेंट मुक्त करण्यासाठी हालचाली गतिमान करण्यात आले आहेत. याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार असून 1 जून नंतर हे गाव रेडझोन पासून मुक्त करण्यात येणार आहे. या गावातील सर्व व्यवहार सुरळीत सुरू करण्याच्या दृष्टीने प्रयत्न होणार आहेत.
दिल्ली मरकज येथून तबलिगी धर्म सभेतून परतलेल्या नागरिकांना कोरोना झाली होती. पहिली घटना हिरेबागेवाडी येथे घडल्याने खळबळ माजली होती. बेळगाव तालुक्यात एकच गोंधळ माजला होता. त्यानंतर या गावात संसर्ग वाढल्याने मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळले होते. आता या गावातील रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे हे गाव कंटेनमेंट झोन मुक्त करण्यासाठी हालचाली गतिमान करण्यात आले आहेत. याबाबतची घोषणा लवकरच करण्यात येणार असून 1 जून नंतर प्रशासन हे गाव कंटेनमेंटझोन मुक्त करणार असल्याची माहिती मिळाली आहे.
सध्या या गावातील शेतकऱ्यांना शेतीसाठी मुभा देण्यात आली आहे. त्याचबरोबर इतर व्यवसाय लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मागील काही दिवसांपासून या गावातील रुग्णसंख्या वाढलेली नसल्याने प्रशासनाने हा निर्णय घेण्याचे ठरविले आहे. या गावातील नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यावर भर देण्यात आला आहे. तालुका पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी देखील या गावाला भेट देऊन येथील परिस्थिती जाणून घेतली आहे. सध्या या गावात मोजकीच रुग्ण असल्याने हे गाव कंटेनमेंट मुक्त करण्याची घोषणा करण्यात आली आहे. तालुक्यातील हिरेबागेवाडी येथे कोरोना रुग्णाची संख्या वाढत होती. मात्र आता ती काही अंशी थांबले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने हे गाव कंटेनमेंट झोनपासून मुक्त करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. याबाबतची घोषणा लवकरच करण्यात येणार आहे.
सध्या या गावात कोरोना बाधितांची संख्या 20 हून अधिक सापडल्याने हे गाव रेड झोन’मध्ये टाकण्यात आले होते. आता या गावातील रुग्ण बरे होत आहेत. तर एका 80 वर्षीय वृद्धेचा देखील मृत्यू झाला आहे. त्या दृष्टिकोनातून या गावाला मागील दोन महिन्यापासून रेड झोन’मध्ये टाकण्यात आले होते. आता पुन्हा हे गाव कंटेनमेंट मुक्त करण्यासाठी हालचाली गतिमान करण्यात आले आहेत. याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार असून 1 जून नंतर हे गाव रेडझोन पासून मुक्त करण्यात येणार आहे. या गावातील सर्व व्यवहार सुरळीत सुरू करण्याच्या दृष्टीने प्रयत्न होणार आहेत. दिल्ली मरकज येथून तबलिगी धर्म सभेतून परतलेल्या नागरिकांना कोरोना झाली होती. पहिली घटना हिरेबागेवाडी येथे घडल्याने खळबळ माजली होती.
बेळगाव तालुक्यात एकच गोंधळ माजला होता. त्यानंतर या गावात संसर्ग वाढल्याने मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळले होते. आता या गावातील रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे हे गाव कंटेनमेंट झोन मुक्त करण्यासाठी हालचाली गतिमान करण्यात आले आहेत. याबाबतची घोषणा लवकरच करण्यात येणार असून 1 जून नंतर प्रशासन हे गाव कंटेनमेंटझोन मुक्त करणार असल्याची माहिती मिळाली आहे. सध्या या गावातील शेतकऱ्यांना शेतीसाठी मुभा देण्यात आली आहे. त्याचबरोबर इतर व्यवसाय लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मागील काही दिवसांपासून या गावातील रुग्णसंख्या वाढलेली नसल्याने प्रशासनाने हा निर्णय घेण्याचे ठरविले आहे. या गावातील नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यावर भर देण्यात आला आहे. तालुका पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी देखील या गावाला भेट देऊन येथील परिस्थिती जाणून घेतली आहे. सध्या या गावात मोजकीच रुग्ण असल्याने हे गाव कंटेनमेंट मुक्त करण्याची घोषणा करण्यात आली आहे.