मास्क न घालता सार्वजनिक ठिकाणी फिरणाऱ्या आणि सोशल डिस्टनसिंग न पाळणाऱ्या व्यक्तिविरुद्ध महानगरपालिकेने कडक कारवाई सुरू केली आहे.मंगळवारी दिवसभरात 43 हजार रु दंड महानगरपालिकेने वसूल केला आहे.
तिसऱ्या टप्प्यातील लॉक डाऊनला प्रारंभ झाल्यावर अनेक उद्योग,व्यवसाय सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
तसेच नागरिकांना सकाळी सात ते सायंकाळी सात या वेळेत कामासाठी बाहेर पडण्यासही परवानगी देण्यात आली आहे.घराबाहेर पडणाऱ्या व्यक्तींनी मास्क घालून बाहेर पडणे बंधनकारक आहे असा नियम बजावण्यात आला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असला तरी अनेक जण सार्वजनिक ठिकाणी मास्क न घालता फिरत आहेत.त्यांच्याविरुद्ध महानगरपालिका कडक कारवाई करेल असे मनपा आयुक्त के एच जगदीश यांनी कळविले आहे.
राज्य सरकारने सार्वजनिक रित्या मास्क न घालणाऱ्या विरोधात 200 रुपये दंड करा असा आदेश बजावला होता त्यानुसार बेळगाव मनपाने धडक कारवाई सुरू केली आहे.