राज्यात कोविड -19 प्रकरणांमध्ये वाढ असूनही कर्नाटकातील शासकीय मंदिरे १ जून रोजी पुन्हा सुरू होतील.
मंगळवारी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
याची घोषणा करताना मुझराई मंत्री कोटा श्रीनिवास पूजारी म्हणाले, “भाविकांना सामाजिक अंतर राखण्याची गरज आहे.”
बुधवारीपासून सुमारे 52 मंदिरे ऑनलाइन सेवा सुरू करणार आहेत.ही मंदिर सरकारच्या ताब्यातील आहेत.
अन्य धार्मिक स्थळे पुन्हा उघडण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला नाही. चर्च, मशिदींना दरवाजे उघडण्यास परवानगी देण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.अशी माहिती मिळाली आहे.