मंदिर ,मठ याचबरोबर इतर धार्मिक कार्यक्रमामध्ये आम्ही पारंपरिक पध्दतीने पुरोहिताचे काम करतो.मात्र लॉकडाऊनमुळे सर्व पूजा अर्चा बंद झाली आहे. त्यामुळे आमच्यावरही संकट कोसळले आहे. तेव्हा सरकारने गांभीर्याने विचार करुन वंचित असलेल्या या घटकाला आर्थिक मदत करावी, अशी मागणी कर्नाटक राज्य विरशैव जंगम पुरोहित संघटनेच्यावतीने जिल्हाधिऱ्यांकडे निवेदनाव्दारे केली आहे.
आम्ही वडिलोपार्जितच हा व्यवसाय करत आलो आहे. धार्मिक कार्यक्रमामध्ये पूजा – अर्चा करणे, मंदिरामध्ये नियमीत पूजा करणे, मठामध्ये पूजा करणे हे काम आजपर्यंत केले आहे.
कर्नाटक राज्यात जवळपास १ ते सव्वा लाख पुरोहित आहेत. मात्र लॉकडाऊनमुळे आम्हाला काम नाही. तेव्हा सरकारने याचा गांभीर्याने विचार करुन आम्हालाही आर्थिक मदत करावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
यावेळी राज्याध्यक्ष चंद्रशेखर शास्त्री, बार असोसिएशनचे अध्यक्ष ए. जी. मुळवाडमठ, विजय शास्त्री, पवन शास्त्री शकरय्या शास्त्री, चंद्रशेखर सवडी, सोम हिरेमठ, संगमेश शास्त्री निर्लगीमठ याच्यासह पुरोहित उपस्थित होते.