कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा यांनी लॉक डाऊन संदर्भात महत्वपूर्ण घोषणा केली आहे.मंगळवारपासून सलूनसह सगळी दुकाने उघडण्यास सरकारने परवानगी दिली आहे.फक्त मॉल, चित्रपटगृह,जिम आदी उघडण्यास परवानगी देण्यात आलेली नाही.
उद्याने सकाळी सात ते नऊ आणि सायंकाळी पाच ते सात या वेळेत उघडी राहणार आहेत.बस वाहतूक सुरू होणार असून एका बसमधून केवळ तीस प्रवाशांना प्रवास करता येणार आहे.
रिक्षा आणि कॅब सुरू करण्यास देखील सरकारने परवानगी दिली आहे.चालक आणि अन्य दोन व्यक्ती याना प्रवास करता येईल.रविवारी मात्र संपूर्ण लॉक डाऊन असणार आहे.या दिवशी कोणतीही दुकाने उघडी राहणार नाहीत.
सायंकाळी सात ते सकाळी सात मात्र सगळे व्यवहार बंद राहणार असून या वेळेत घराबाहेर पडण्यास अनुमती नाही.