तापत्या गर्मीने हैरान झालेल्या बेळगाव शहरातील लोकांनी रविवारी दुपारी वळीव पावसाने दिलेल्या दणक्या नंतर सुखद गारवा अनुभवला.एक तासांहून अधिक काळ झालेल्या पावसाने वातावरणात बदल झाला होता.
मान्सूनपूर्व मुसळधार पावसाने बेळगावला एक तासाहून अधिक काळ झोडपून काढले.रविवारी लॉक डाऊन नसल्यामुळे नागरिक खरेदीसाठी मोठया संख्येने बाहेर पडले होते.खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांची पावसापासून बचावासाठी आसरा शोधताना तारांबळ उडाली.एक तासभर झालेल्या मुसळधार पावसामुळे सगळीकडे पाणीच पाणी झाले.
गेल्या दोन दिवसांपासून बेळगाव आणि परिसरात उष्मा कमालीचा वाढला होता.पावसाच्या सरी कोसळणार असे वाटत होते पण दोन दिवस पावसाने हुलकावणी दिली होती.अखेर रविवारी दुपारी आकाश अंधारून आले आणि काही वेळाने पावसाला सुरुवात झाली.
एक तास मुसळधार पावसाने झोडपून काढले.अचानक आलेल्या पावसामुळे बाजारात खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची आणि रस्त्यावरील विक्रेत्यांची तारांबळ उडाली.पावसामुळे बेळगावकराना सुखद गारवा अनुभवायला मिळाला.