शिक्षण मंत्री सुरेशकुमार यांनी एस एस एल सी परीक्षेचे वेळापत्रक सोमवारी कॅबिनेट बैठकी नंतर जाहीर केले. लॉक डाऊनमूळे देशातील कर्नाटकातील दहावीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती.
31 मे पर्यंत देशात लॉक डाऊन जारी करण्यात आला असून लक्ष लागून दहावीची परिक्षा 25 जून ते 4 जुलै या काळात घेतली जाणार आहे.
तसेच राज्यातील puc द्वितीय बारावीचा इंग्लिश पेपर झाला नव्हता तो पेपर देखील 18 जून रोजी घेतला जाणार आहे.या अगोदर पासून दहावीची परीक्षा घेण्याची तयारी शिक्षण खात्याने चालवली आहे.सोशल डिस्टन्सचा अवलंब केला जाणार आहे.
शिक्षकांसोबत चर्चा करून वेळापत्रक ठरवलं आहे दहावीसाठी इंग्लिश गणित सायन्स आणि सोशल सायन्स या विषयावर एक एक दिवस अधिक देण्यात आला आहे.
परीक्षा सुरू होण्यापूर्वी सर्व वर्ग सॅनिटायजर केले जातील प्रत्येक विद्यार्थ्याने सॅनिटायजर वापरावे यासाठी राज्य स्काउट गाईड ची मदत घेणार आहोत कुणालाही आरोग्याची समस्या असेल अश्यनाही परीक्षा बसायला देणार आहोत असे सुरेश कुमार यांनी म्हटलं आहे