Monday, December 30, 2024

/

मजगाव डेंग्यूने त्रस्त-प्रशासन मात्र सुस्त

 belgaum

कोरोनाचा जागतिक पातळीवर इतका गवगवा झाला आहे, त्यामुळे सरकार पूर्णपणे कोरोणाच्या संकटातून जनतेला बाहेर काढण्याच्या मागे लागले आहे. पण कोरोनाबरोबरच इतरही रोग आपले अस्तित्व टिकवून आहेत.

मजगावमध्ये अशीच कोरोनाबरोबरच डेंग्युमुळेही जनता हतबल झाली आहे. सध्याच्या कालखंडात डेंग्युमुळे दोघांचा मृत्यू झाला तर अनेक जण हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. तेंव्हा महापालिकेने व प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देवून ठोस कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.

जंतुनाशक फवारणी त्याचबरोबर परिसराची स्वच्छता ही करण्याची गरज आहे. डेंग्युबाबत दक्षता घेण्यासाठी जनजागृती करुन, लोकांना डेंगूच्याही संकटातून वाचवावे अशी मागणी मजगाव येथील नागरिकांनीजिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाव्दारे केली आहे.

Majgaon memo
Majgaon memo dc office belgaum

कोरोनाचा अस्मानी संकट आलेच आहे, त्याचबरोबर डेंग्यूचाही फैलाव आणखी वाढला तर येथील नागरिकांचे जगणे असह्य होणार आहे. गेल्या १५ दिवसांपासून या परिसरात डेंग्युचा फेलाव वाढत चालला आहे. डेंगूचा डास साठवलेल्या पाण्यात वाढतो, त्यामुळे लोकांना पिण्यासाठी पाणी साठवण्याची गरज भासणार नाही अशी स्थिती महानगरपालिकेने केली पाहिजे. पाणी पुरवठा सुरळीत राखणे गरजेचे आहे. त्यामुळे पाणीसाठा करावा लागणार नाही, याची महापालिकेने आत्ताच दखल घेतली पाहिजे, अशी मागणी करण्यात आली.

या परिसरात ओषध फवारणीची गरजअसताना महापालिकेने अद्याप औषध फवारणीच केली नाही. असा आरोपही येथील नागरिकांकडून करण्यात आला. डेंग्युमुळे अनेक जण रुग्ण झाले आहेत. याची दखल घेतली नाही तर, तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. शिरस्तेदार मंजुनाथ जानकी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी मजगाव येथील नागरिकांसहअॅड. नागेश सातेरी, बी. डी. मारिहाळ डी. एस. नदार पी. एन. हट्टीहोळी, अॅड. अजय सातेरी, दीपक सातगोडा उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.